Saturday, February 27, 2021

https://youtu.be/R23Yam6OZ5A

https://youtu.be/R23Yam6OZ5A

परिसंवाद

https://youtu.be/R23Yam6OZ5A

'* हे अक्षर असलेली जगातली एकमेव भाषा म्हणजे आपली मराठी...!!!*



*'ळ' अक्षर नसेल तर?*

*पळणार कसे...*

*वळणार कसे...*

*तंबाखू मळणार कसे..*

*दुसर्‍यावर जळणार कसे!*

*भजी तळणार कशी?*

*सौंदर्यावर भाळणार कसे?*

*पोरं-टोरं तळयात-मळ्यात खेळणार कशी..?*

*तीळगूळ कसा खाणार?*

*टाळे कसे लावणार ?*

*बाळाला वाळे कसे घालणार....!*

*खुळखुळा कसा देणार?*

*घड्याळ नाही तर  सकाळी डोळे कसे उघडणार ?*

*घड्याळ बंद पडले तर पळ कोण मोजणार?*

*वेळ पाळणार कशी ?*

*मने जुळणार कशी ?*

*खिळे कोण ठोकणार ?*

*तळे भरणार कसे ?*

*नदी सागरला मिळणार कशी........!!*

*मनातली जखम भळाभळा वाहणार कशी?*

*हिवाळा, उन्हाळा, पावसाळा....*

*नाही उन्हाच्या झळा*

*नाही त्या निळ्या*

*आभाळातून पागोळ्या खळाखळा....*!

*कळी कशी खुलणार ?*

*गालाला खळी कशी पडणार ?*

*फळा, शाळा मैत्रिणींच्या  गळ्यात गळा....*

*सगळे सारखे, कोण निराळा?*

*दिवाळी, होळी सणाचे काय......?*

*कडबोळी,पुरणपोळी  ओवाळणी पण नाही ?*

*तुम्ही काय चिंचपोकळीला रहाता ?*

*भोळा सांब ,*

*सावळा श्याम*

*जपमाळ नसेल तर  कुठून रामनाम ?*

*मातीची ढेकळे नांगरणार कोण?*

*ढवळे पवळे बैल जोततील कोण?*

*पन्हाळ्याची थंड हवा खाणार कोण ?*

*निळे आकाश, पिवळा चाफा...*

*माळ्याच्या कष्टाने फळा फुलांनी बहरलेला मळा !*

*नारळ, केळ, जांभूळ, आवळा,*

*नवर्‍याला बावळट बोलणार कसे*

*काळा कावळा,  पांढरा बगळा*

*ओवळ्या बकुळीचा गजरा माळावा कसा*

*अळी मिळी गुपचिळी, बसेल कशी दांतखिळी?*

*नाही भेळ,*

*नाही मिसळ,*

*नाही जळजळ*

*नाही मळमळ*

*नाही तारुण्याची सळसळ*

*पोळ्या लाटल्या जाणार नाहीत.....*

*टाळ्या आता वाजणार नाहीत.....!*

*जुळी तीळी होणार नाहीत.......!!*

*बाळंतविडे बनणार नाहीत......!!*

*तळमळ कळकळ वाटणार नाही....!!*

*काळजी कसलीच उरणार नाही...!!!*

*पाठबळ कुणाचे मिळणार नाही*

*सगळेच बळ निघून जाईल,*

*काळ आला होता पण वेळ आली नव्हती*

*पण काहीच कळेनासे होईल 'ळ' शिवाय !*

*'ळ' अक्षराची माहिती सांगणारा लेख...!*

 *मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा* 💐💐🚩🚩

Friday, February 26, 2021

मातृत्व (कथा)


मोबाईलचा आवाज ऐकून मीनाला जाग आली. दुपारच्या वेळी कोणी फोन केला असेल याचा विचार करत ती सावकाश उठून बसली. सात वर्षाचा गौरव जवळच खेळत होता. न सांगताच त्याने मोबाईल आईला आणून दिला.

“ हॅलो, “ मीना सावकाश बोलली.

“ हॅलो मीना! कशी तब्येत आहे ?

“ आता बरी आहे.”

“ मि.राजेश कसे आहेत ?

“ आता तेही ठीक आहेत. अपघातातून वाचले हेच आमचे नशीब म्हणायचे ! पायावर पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.”

“ अच्छा ! मीना, मला कसं सांगू कळत नाही. पण सांगणं आवश्यक आहे. काल अमेरिकेतून फोन आला होता. मिस्टर व मिसेस सॅम्युअल आता या जगात नाहीत.”

“ काय ?” मीना किंचाळली. राजेशला जाग आली. तो पडल्या पडल्या संभाषण ऐकू लागला.

“ मीना कुल डाऊन. सांभाळ स्वत:ला. “

“ कायं.. कायं झालं त्यांना अचानक ?”

“ अग मिसेस सॅम्युअलना कोरोना झाला होता. त्या पंधरा दिवसापूर्वी गेल्या. मिस्टर सॅम्युअलना काल हार्ट अँर्टॅक आला. त्यांच्या वकीलाचा फोन आला होता. त्यांनी या महिन्याचे पैसे पाठविले आहेत. पुढच्या महिन्यापासून पैसे पाठवू शकणार नाही, असे कळवले आहे आणि मीना, आता बाळाची जबाबदारी कोणी घेणार नाही तेव्हा बहुतेक तुम्हांला ....”

मीनाला काही सुचेना. ती थरथरायला लागली. तिने फोन कट केला. सुन्न होऊन खुर्चीत बसली. राजेश कॉटवर उठून बसला. आपल्या आईला नेमकं काय झालं आहे गौरवला कळेना. तो भांबावल्या नजरेने आईकडे पहायला लागला.

राजेशने गौरवला सांगितले, “ गौरव, आईला जरा पाणी आणून दे.” गौरवने मीनाला पाणी दिले. पाणी प्यायल्यावर तिला जरा बरे वाटले. ती गौरवला म्हणाली, “ गौरव, थोडावेळ प्रतिकबरोबर खेळायला जातोस का ? तू सकाळी जायचं म्हणत होतासं ना!”


२.

“ माझ्याकडची सापशिडी घेऊन जाऊ का आई? ,“ गौरव म्हणाला.

“ बरं ! ” कसंनुसं हसत मीना म्हणाली. गौरव बाहेर गेला. राजेशने शांतपणे विचारले, “ फोन कोणाचा होता ? नेमकं काय झालं ? ”

मीनाने आवंढा गिळला व म्हणाली, “ अँडव्होकेट कदमबाईंचा फोन होता.”

मीनाला घाम फुटत होता. तिची ती तणावपूर्ण अवस्था राजेशला कळेना. तो म्हणाला, “ तू एवढी का घाबरली आहेस? असं काय सांगितलं त्यांनी?”

मीना दबक्या आवाजात म्हणाली, “ मिस्टर व मिसेस सॅम्युअल आता या जगात नाहीत.”

“ असं कसं होईल? ते पंधरा दिवसापूर्वी बोलले ना तुझ्याशी ?”

“ हो! ते बोलले. त्यावेळी ते थोडे थकलेले जाणवत होते. त्याच कालावधीत मिसेस सॅम्युअल कोरोनाने गेल्या. काल मिस्टर सॅम्युअल हॉर्ट अँटॅकने गेले. या महिन्यात फक्त पैसे मिळणार असं त्यांचा वकील म्हणाला आणि ... “ मीना बोलायची थांबली.

“ अगं आणि काय ? तुझ्या पोटातल्या बाळाचं काय ?” राजेश रागाने बोलला.

“ आता बाळाला कोण स्वीकारणार? ज्याना हवं होत ते तर गेले.”

राजेश आवेशाने म्हणाला,” मीना, अग हे आपलं बाळ नाही. त्यात तुझा-माझा अंश नाही. तू फक्त सरोगेट मदर आहेस.”

मीना भरल्या डोळ्यांनी म्हणाली, “ पण ज्यांचा तो अंश आहे ते आता या जगात नाहीत. “

राजेश तुसड्यासारखा म्हणाला, “ मग त्यालाही या जगात राहायचा अधिकार नाही. जन्माला येण्याआधीच आईबापाला खाणारं हे मूल मीना या घरात नको. “

राजेशच्या या बोलण्याने मीना हादरून गेली. ती काय बोलणार होती. पाच महिन्यापूर्वी राजेशचा अपघात झाला. मित्राच्या बाईकवरून येताना एका ट्रकने त्यांना उडवले. मित्र त्याच वेळी गेला. राजेश मात्र गंभीर जखमी झाला. डोक्याला मार लागल्याने शस्त्रक्रिया करावी लागणार होती. दोन्ही पायाची हाडं मोडली होती. हॉस्पिटलचा लाखो रूपयांचा खर्च कसा करायचा हा त्या वेळी मीनासमोर यक्ष प्रश्न होता. नातेवाईकांनी हात वर केले. अपघाताच्या केस संदर्भात तिची अँडव्होकेट कदमबाईंशी ओळख झाली. मीनाच्या आर्थिक परिस्थितीवर तिने सरोगेट मदर बनण्याचा सल्ला दिला. ज्यांना मूल होत नाही त्यांना आपलं गर्भाशय भाड्याने द्यायचं. सुरूवातीला मीनाने या सल्ल्याला केराची टोपली दाखवली. पण एका ऑपरेशनलाच तिचे दागिने, साठवलेले पैसे संपले.


३.

घरखर्च चालवणंही तिला अवघड होतं. अजून राजेशचे दोन ऑपरेशन बाकी होते. तो आपल्या पायावर उभा राहिल की नाही हेही माहित नव्हते. शिक्षण कमी असल्याने मीनाला चांगली नोकरी मिळणं अवघड होतं. वेगवेगळ्या संस्थाकडून मदत मिळवण्याचा तिने प्रयत्न केला. पण म्हणावे तसे यश मिळाले नाही. शेवटी धीर एकवटून तिने राजेशला सरोगेट मदर होऊ का विचारले. त्याच्याकडेही दुसरा पर्याय नसल्याने त्याने मंजुरी दिली.

मिस्टर व मिसेस सॅम्युअल दोन दिवसात अमेरिकेहुन आले. कायदेशीरबाबी पूर्ण करून झाल्यावर आठ दिवसात मीनाच्या गर्भाशयात बीजारोपण करण्यात आले. नऊ महिने घरखर्च व बाळाच्या जन्मानंतर पाच लाख रूपये दिले जाणार होते. सगळं व्यवस्थित चालू होतं आणि आता अचानक ही बातमी...

मीनाने डोळे पुसले. राजेश म्हणाला, “ हे बघ मीना, जास्त विचार करू नकोस. उद्याच डॉक्टरकडे जा आणि पाडून टाक तो गर्भ. तो आपला नाही आणि खर्चही आपल्याला परवडणारा नाही.”

मीनाने काहीच उत्तर दिले नाही. एवढ्यात गौरव आला. आईकडे खाऊ मागायला लागला. मीनाने त्याला डब्यातला चिवडा दिला व ती संध्याकाळच्या स्वंयपाकाला लागली. खाता खाता गौरव मीनाकडे आला व म्हणाला, “ आई आपलं बाळ कधी बाहेर येईल? राजू आपल्या ताईबरोबर खेळतो. सोनू आपल्या दादाबरोबर खेळते. मलाही माझ्या भावाबरोबर खेळायचे आहे. लवकर येईल ना बाळ आई?”


मीनाने आपल्या पोटावर हात ठेवला व म्हणाली, “ अजून पाच महिनेतरी लागतील ; पण तुला त्याच्याबरोबर खेळायला दोन-तीन वर्षे थांबावे लागेल ,” असं म्हणत तिने गौरवचा गालगुच्चा घेतला.

“ ठीक आहे. ते येईल त्या वेळी मी खेळेन, “असं हसून गौरव म्हणाला व उड्या मारायला लागला. त्याचे निरागस विचार मीनाला सुखावून गेले. रात्रभर मीना आपल्या पोटावरून हात फिरवत राहिली. तिला त्या अर्भकाविषयी अचानक प्रेम वाटायला लागले. इतके दिवस ती परक्याचे मूल म्हणूनच विचार करत होती. पण आज त्या निराधार अर्भकाची सरोगेट का असेना आपण ‘ आई ‘ आहोत , याची तिला नव्याने जाणीव होत होती. तिच्यातली आई जागी व्हायला लागली. तिला निराधारांचं मातृत्व स्वीकारणा-या सिंधुताई सपकाळ आठवल्या. सिंधूताईंनी कोण-कुठल्या रस्त्यावरच्या मुलांना आपल्या मायेच्या पदराखाली घेतले होते. मग ज्या अर्भकाने आपला संसार पडत्या काळात सांभाळला, त्याला या जगात न आणणे म्हणजे कृतघ्नपणा ठरेल असे मीनाला वाटायला लागले.


४.

सकाळी मीनाने आपला निर्धार पक्का केला. तिने राजेशला जागे केले व म्हणाली, “ माझा संसार सावरणा-या या बाळाला मी जन्म देणार आणि वाढवणारही. यासाठी मला जे कष्ट करावे लागतील ते एक ‘ आई ‘ म्हणून मी आनंदाने करेन. आता या निर्णयात काही झाले तरी बदल होणार नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. ” उत्तराची वाट न बघता मीना नोकरी शोधण्यासाठी घराबाहेर पडली. चालताना नकळत तिचा हात पोटावरून फिरत होता.


मंगल उमेश कातकर

स्त्री लेखिका

सेल्समनचे आयुष्य (विक्रेत्यांचा दिपस्तंभच !) - पुस्तक परिक्षण


ग्राहक आणि विक्रेते यांच्यातील यशस्वी सुसंवादातूनच बाजारातील अर्थचक्राला गती मिळते, अर्थचक्राला चालना मिळते. हा सवांद, संपर्क आणि विश्वासाचे नाते जर बिघडले तर पर्यायाने उभ्या उद्योगालाच खीळ बसण्याचे भय असते. शरीरातला पाठीचा कणा जसा मजबुतीने उभा देह तोलून धरतो, त्याच शर्तीवर बाजारातील विक्रेता हा संपूर्ण व्यवहाराचा तोल समर्थपणे सांभाळतो. आणि त्यातूनच सकारात्मक परिणाम घडतात. नेमक्या याच विषयावर एक परिपूर्ण आणि मार्गदर्शक असे 'सेल्समनचे आयुष्य' हे पुस्तक डॉ. चेतन कुळकर्णी यांच्या प्रदीर्घ अनुभवातून साकार झाले आहे. जे ग्राहक, विक्रेते, उद्योजक, अभ्यासक यांना दिपस्तंभच ठरणार आहे.


सेल्समन कसा असावा?, कसा नसावा?, त्याची देहबोली, वाईट सवयी, स्वयंशिस्त, टार्गेट अचिव्हमेंट, प्रॉडक्ट नॉलेज, स्पर्धकांची माहिती, नातेसंबंध, आहार, दुकाने, मॉल, सुपरमार्केट मधले सेल्समन अशा प्रकरणातून सुरु झालेला लेखकाचा सवांद हा अगदी नव्या बदलत्या संकल्पनेवरही प्रभावी भाष्य करतो. कुरियर कंपनी, टेलिफोनिक सेल्समन, क्लब-रिसॉर्ट, विमा एजंट, प्रदर्शनातील विक्रेता यावरील दिलेल्या टिप्सही खूप काही सांगून जातात. हे या पुस्तकाचे आकर्षण आणि वैशिष्ठ म्हणावे लागेल.


एकंदर प्रत्येक प्रकरणातील भाषा ही सहजसुंदर आहे. पण त्यासोबतच काही युक्त्या व नवीन सादरीकरण यावरही केलेले निवेदन प्रभावी आहे. एखाद्या ग्राहकाशी संवाद साधत असतांना जर कुणाचा फोन आला तर काय करावे? सेल्समनने आपली डायरी कशी काय अद्यावत ठेवावी?

ग्राहकांना दाखविण्यात येणारी वस्तूची खबरदारी कशी काय द्यावी? विक्रेत्यांचा गणवेश, वृत्ती, संपर्क कौशल्य, कामाच्या वेळा. यावरही तपशिलात जाऊन लेखकाने काही मुद्दे मांडले आहेत. जे विक्रेत्याला 'आदर्श विक्रेता' म्हणून साथसोबत करून सिद्ध करू शकतील.


या पुस्तकाचे लेखक डॉ. चेतन कुळकर्णी हे विक्री विषयक तज्ञ म्हणून ओळखले जातात. गेली तीस एक वर्षे त्यांचा मार्केटिंग क्षेत्रात थेट सहभाग आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना यापूर्वी गौरवण्यातही आले आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाची प्रचिती प्रत्येक प्रकरणातील निवेदनातून येते. अशा काहीशा दुर्लक्षित विषयावर अधिकार वाणीने व समृद्ध अनुभवाच्या जोरावर मराठीत लिखाण करणारे डॉ. कुळकर्णी हे एकमेव लेखक आहेत. 'ओएमजी बुक ऑफ नॅशनल रेकॉर्ड' चेही हे पुस्तक मानकरी ठरते. मराठी वाचकांपर्यंत हा विषय समर्थपणे पोहचला पाहिजे ही तळमळ या पुस्तक निर्मितीमागे स्पष्टपणे दिसून येते.


इंग्रजी भाषेत अशा विषयांवर अनेक पुस्तक आहेत. पण मराठी विक्रेत्यांना मराठी भाषेत सांगणारी प्रकाशने दिसत नाहीत. इंग्रजाळलेल्या या क्षेत्रातील ही मक्तेदारी या पुस्तकामुळे मोडीत निघाली आहे. महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था, वाचनालये, उत्पादन करणाऱ्या कंपन्या यांनी हे पुस्तक संग्रही ठेवावे. आणि महाराष्ट्रातील मराठमोळ्या विक्रेत्यांनी तर या पुस्तकाला गुरुस्थानी मानावे. त्यांच्या कौशल्यात नक्कीच भर पडेल. डॉ. चेतन कुळकर्णी याचे हे पुस्तक विक्रेत्यांच्या वाटेवरले मैलाचे निशाणच आहे

Tuesday, February 23, 2021

लावणी

 लावणी

तमाशाची गाणी

तमाशाची गाणी

हलगी वादन

हलगी वादन

आराधीची गाणी

आराधीची गाणी
भजनी भारुड

पोतराज

पोतराज

गवळण

गवळण

भारुड

https://www.vishwamarathiparishad.org/so/ffNVF72f2/c?w=vNVUt_6VSGkuJX2oXoD_MmCI3mE2B5IDjnYOrklBlFs.eyJ1IjoiaHR0cHM6Ly95b3V0dS5iZS90TmRHNVZYTEZQUSIsInIiOiJiZTcwZDEwZS1jZWI1LTRlYjYtODRkMi1iY2EwYmViODE2MDkiLCJtIjoibWFpbCIsImMiOiJhOWYxODhhNS1lNjE1LTQ0OWYtODI5Ny1iMTA1NmNhM2I5MmMifQभारुड

जात्यावरची गाणी

जात्यावरची गाणी

Saturday, February 20, 2021

जागतिक मातृभाषा दिवस


International Mother Language Day : का साजरा केला जातो जागतिक मातृभाषा दिवस

International Mother Language Day : जगभरात भाषा आणि संस्कृतिप्रती जागृकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे

२१ फेब्रुवारी १९५२ ला ढाका युनिवर्सिटीच्या विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी तत्कालिन पाकिस्तान सरकारच्या भाषा नीतिला जोरदार विरोध केला होता. पाकिस्तानच्या पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर गोळीबारही केला. मात्र, विरोध अधिक वाढला आणि तत्कालिन पाकिस्तान सरकारने बांग्ला भाषेला अधिकृत दर्जा दिला. या आंदोलनादरम्यान शहीद झालेल्या युवकांच्या स्मृती निमित्ताने यूनेस्कोने पहिल्यांदा 1999 मध्ये हा दिवस मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.

यावर्षीची थीम

या जागतिक मातृभाषा दिनानिमित्ताने जगभरात यूनेस्को आणि यूएन भाषा आणि संस्कृतीसंबंधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. दरवर्षी एक खास थीम असते. यावर्षीची म्हणजे २०२० ची थीम "Languages without borders" अशी आहे. गेल्यावर्षी Indigenous languages as a factor in development, peace and reconciliation अशी थीम होती.

या नावांनीही ओळखला जातो हा दिवस

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाला टंग डे (Tongue Day), मदर लँग्वेज डे (Mother language Day), मदर टंग डे (Mother Tongue Day) , लँग्वेज मूव्हमेंट डे (Language Movement Day) आणि Shohid Dibosh या नावाने देखील ओळखले जाते.

भारतात देखील शेकडो भाषा बोलल्या जातात. वर्ष १९६१ च्या जनगणनेनुसार, भारतात १६५२ भाषा बोलल्या जातात. तसेच सध्याच्या रिपोर्टनुसार, भारतात १३६५ मातृभाषा आहेत.